बक्षीसपत्र म्हणजे नेमकं काय? ते रद्द करता येते का? त्यासाठी शुल्क किती असते?

जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? बक्षीसपत्र कसं करायच? त्याद्वारे कोणती मालमत्ता देता येते? वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का?
On this page

तुम्हाला जर शेतजमीन असेल, तर सातबारा उतारा, फेरफार, भू-नकाशा, चतुरसीमा अश्या सर्व बाबींचा अभ्यास असेल किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी या गोष्टी ऐकल्या असतील. यासोबतच दुर्मिळ असा वाटणारा शब्द म्हणजे जमिनीच बक्षीसपत्र! ही संकल्पना नेमकी काय आहे? बक्षीसपत्र कसं आणि कुठ करायचं? यासंदर्भातील थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय ? बक्षीसपत्र कसं करायच ? त्याद्वारे कोणती मालमत्ता देता येते?

बक्षीस-पत्र म्हणजे नेमकं काय?

कोणतीही व्यक्तीच्या नावाने असलेली जमीन मग ती जमीन स्वतःच्या कष्टाने कमावलेली असेल अथवा जंगम मिळकत जमीन असेल, जमीनदार व्यक्ती स्वतःच्या इच्छानुसार आपल्या वारसांना, वारसापैकी एक अथवा वारस सोडून इतर व्यक्तींना किंवा स्वयंसेवी संस्थेस किंवा देशाला जमीन मालमत्ता देण्याची इच्छा लिखित स्वरूपात लिहून देत असेल, तर या प्रक्रियेला किंवा या स्वरूपाला बक्षीस पत्र असं म्हटलं जातं. बक्षीसपत्राला इंग्रजीत Gift Deed या नावाने संबोधल जात.

स्व कष्टाने कमावलेली जमीन किंवा मिळकत आपण बक्षीस पत्र म्हणून बहाल करू शकतो; पण वारसा हक्क असलेली मालमत्ता किंवा जमीनीचे बक्षीसपत्र करता येत नाही. बक्षीस पत्र सध्या कागदावर स्वतः लिखित स्वरूपात करता येईल; परंतु त्यासाठी कायद्याच्या कक्षेत बसणाऱ्या व्यक्तीकडून अर्जाचा मायना लिहून साक्षीदारांच्या सह्या घेणे आवश्यक आहे.

बक्षीसपत्र मुद्रांक शुल्क किती असते?

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 2017 चा नियमानुसार राज्य बक्षीसपत्र मालमत्तेच्या मूळ किमतीच्या 3% मुद्रांक शुल्क म्हणून आकारला जातो आणि कुटुंबातील रक्तातील म्हणजेच सख्या नात्यातील सदस्यांना कोणतेही पैसे न देता शेतजमीन भेट म्हणून देण्यात आल्यास अशा परिस्थितीत आजच्या नियमानुसार रु. 500 स्टॅम्प व जागेच्या सरकारी मूल्याच्या 1% टक्के नोंदणी खर्च येतो.

स्टॅम्प पेपरचे मूल्य हे व्यवहाराच्या प्रकार आणि मूल्यावर अवलंबून असते. स्टॅम्प पेपरचे मूल्य व्यवहार मूल्याची टक्केवारी म्हणून मोजले जाते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात, मालमत्ता व्यवहारासाठी स्टॅम्प शुल्क ५% आहे. म्हणजे, जर आपण १० लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केली तर आपण ५० हजार रुपयांचे स्टॅम्प शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण ५० हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर वापरू शकता. त्याचप्रमाणे, इतर व्यवहारांसाठी वेगवेगळे दर आहेत.

उदाहरणार्थ, रोजगार करारासाठी १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर, विक्री करारासाठी ३%, भेटवस्तूसाठी ३% आणि लीज करारासाठी ०.५% असते. त्यामुळे, व्यवहाराच्या प्रकार आणि मूल्यानुसार आपण योग्य मुद्रांक पेपर वापरणे आवश्यक आहे. आपण ऑनलाइन मुद्रांक पेपर मिळवू शकता किंवा अधिकृत मुद्रांक विक्रेते, बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून मिळवू शकता.

रजिस्ट्री उपस्थिती अनिवार्य

बक्षीसपत्र रजिस्ट्री करत असताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यावे लागेल, जशाप्रकारे बक्षीस कोणाला देत आहोत, त्या व्यक्तींचा आपल्याशी नातं आणि स्पष्टीकरण लिहिणं अत्यंत महत्त्वाचा असतं. सोबतच मिळकत हस्तांतराचा दस्तावेज नोंदणी करताना नोंदणी कायद्यानुसार लिहून घेणारा व लिहून देणारा या दोघांची सही व इतर सोपस्कारंसाठी सह दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थिती असणे अनिवार्य आहे. बक्षीसपत्र साध्या कागदावर स्वतःचा हस्ताक्षरात करता येते; पण नातलगांचा विरोध किंवा पुढे कोर्टात आवाहन दिल जाऊ शकतात यामुळे पहिल्यांदाच काळजी घेऊन बक्षीसपत्र लिहून घेत असताना विश्वासातील कोणत्याही दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे आवश्यक असतात.

बक्षीस पत्र रद्द करता येते का?

हो, बक्षीस पत्र अपवादात्मक परिस्थितीत रद्द करता येते. जर बक्षीस पत्रात काही शर्ती असतील आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दाता ते रद्द करू शकतो. तसेच, जर दाता आणि लाभार्थीने ठरविले असेल की एखादी घटना किंवा विशिष्ट गोष्ट घडली तर बक्षीस पत्र होईल, आणि तशी घटना घडली तर बक्षीस पत्र रद्द होऊ शकते. मात्र, जर दात्याचे नियंत्रण असेल तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. अधिक माहितीसाठी कायदेशीर सल्ला घेणे उत्तम ठरेल.

वडिलोपार्जित जमीन नावावर करणे

एखादी मालमत्ता जसे शेत, घर, प्लॉट तुमच्या नावे करायचे असल्यास कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. त्याचबरोबर ती जागा तुम्ही स्वत: घेतली आहे की वडिलोपार्जित आहे यावरून कागदपत्रे कोणती लागतात ते ठरते. साल २००५ च्या कायद्यानुसार वडीलोपार्जित मलमत्तेवर मुलींचा अधिकार आहे. कुटुंबातील मयत व्यक्तीच्या सर्व वारसदारांची परवानगी असल्यास तहसीलदार जमीन वाटपाची नोटिस काढतो. त्यासाठी आधी जमीन महसूल कायदा १९६६ कलम ८५ अनुसार सातबारा उताऱ्यात नाव लावण्याकरीता तहसिलदाराकडे तुम्हांला अर्ज द्यावा लागतो.

जमीन नावावर करण्यासाठी कागदपत्रे

  • अर्ज
  • वैयक्तिक व रहिवासी ओळखपत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र
  • वारसा हक्क प्रमाणपत्र
  • संमतीपत्र / हक्कसोड पत्र
  • घर नोंदणी प्रमाणपत्र
  • तहसीलदार अहवाल
  • मयत व्यक्तीशी नाते सांगणारा पुरावा
  • शपथपत्र

vadiloparjit jamin navavar karne याची प्रक्रिया, कायद्यानुसार कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्यासाठी असलेली तहसिलदाराची भूमिका, तुम्हांला समजले असावे. यासाठी अधिकृत वारस दाखला तुमच्याकडे असावा, हे एक महत्वाचे दस्त आहे.

जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च येतो?

जमीन नावावर करण्यासाठी सरकारने नवीन नियम जारी केले आहेत ज्यामुळे आता फक्त 100 रुपये खर्च येतो. वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता तुमच्या नावावर करण्यासाठी हा खर्च आहे. यासाठी वारसा प्रमाणपत्र तलाठी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे आणि त्याची नोंदणी तहसीलदार कार्यालयात करावी लागेल. अधिक माहितीसाठी आपण संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का?

वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते, परंतु काही अटी-शर्तींच्या अधीन:

  • जमीन कायदेशीर गरजांसाठी वापरली असेल तर वारसाला त्यात हिस्सा मागता येत नाही.
  • जमीन एकत्र कुटुंबाच्या गरजांसाठी वापरली असेल तर वारसाला त्यात हिस्सा मागता येत नाही.
  • जमीन कुटुंबातील इतर सदस्यांच्या हक्कांना बाधा येईल अशा प्रकारे वापरली असेल तर वारसाला त्यात हिस्सा मागता येत नाही.

जर वरील अटी पूर्ण होत असतील तर वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्राने इतर व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करता येते. बक्षीस पत्र हा एक महत्वाचा कायदेशीर दस्तऐवज असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

बक्षीस पत्र जमीन विकता येते का?

बक्षीस पत्रानुसार दिलेली जमीन विकता येत नाही. बक्षीस पत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून, जमिनीचा मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये बक्षीस पत्राच्या माध्यमातून जमिनीची मालमत्ता हस्तांतरित केली जाते, पण जमिनीचे विक्री करण्याचा काही संबंध नाही.

हक्कसोड पत्र नमुना pdf

क्लिक करा

घर नावावर करणे अर्ज नमुना

क्लिक करा

वारस प्रमाणपत्र नमुना pdf

वारस प्रमाणपत्र नमुना pdf 166kb

निष्कर्ष:

वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र हे मालमत्ता हस्तांतरित करण्याचा एक कायदेशीर आणि वैध मार्ग आहे. बक्षीस पत्र करण्याचा विचार करत असल्यास, वकीलाचा सल्ला घेणे आणि सर्व कायदेशीर बाबींचा विचार करणे महत्वाचे आहे.

टीप:हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की कायदेशीर बाबी गुंतागुंतीच्या असू शकतात आणि वरील माहिती फक्त माहितीसाठी आहे. आपल्या विशिष्ट परिस्थितीसाठी कायदेशीर सल्ला घेणे नेहमीच चांगले.

हेही वाचा....

Getting Info...

लेखकाबद्दल

I am a farmer by profession.
Agriculture is my life.
News reporter, Content writer, Learner

टिप्पणी पोस्ट करा

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.